Home Award समाजसेवक आमटे दाम्पत्याला ‘जीवन गौरव पुरस्कार’

समाजसेवक आमटे दाम्पत्याला ‘जीवन गौरव पुरस्कार’

480

– समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप, बिबी तर्फे दिला जाणार सन्मान

चंद्रपूर ब्यूरो : समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी, जि. चंद्रपूर यांच्या तर्फे दिल्या जाणारे दिव्यग्राम 2022 सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार 2022 आशियाचा नोबल ‘रॅमन मॅगेसेसे’ आणि महाराष्ट्र भूषण व पद्मश्री ने सन्मानित, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हेमलकसा येथील थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आला आहे.

आगामी 7 नोव्हेंबर 2022 ला सायं 5 वाजता बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.