Home Business #Nagpur । स्पेशल हॅण्डलूम एक्स्पो २०२२ ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

#Nagpur । स्पेशल हॅण्डलूम एक्स्पो २०२२ ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

388

2 नोव्हेंबरपर्यंत चालणार प्रदर्शनी, हातमाग संस्थांद्वारे ग्राहकांना 20% सवलत

नागपूर ब्युरो : राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या प्रचार प्रसिद्धी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ लि., नागपूर यांनी उत्पादित केलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन व विक्री दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, 56/1, टेम्पल रोड, सिविल लाइन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

हातमागावर बनवलेले विविध प्रकारचे कपडे प्रदर्शनात उपलब्ध आहेत. यामध्ये सिल्क, टसर करवती साड्या, पैठणी साड्या (GI प्रमाणित), सिल्क टसर ड्रेस मटेरियल, लेडीज-जेंट्स आणि लहान मुलांचे कपडे, बांबू केळी मिश्रित कापड आणि साड्या, कॉटन साड्या, स्कार्फ, स्टोल्स, दुपट्टे, टाय, दैनंदिन वापरातील चादरी, टॉवेल. बेडशीट, रग्ज इ. समावेश आहे.

प्रदर्शनात नागपूर, सोलापूर, भंडारा, औरंगाबाद या जिल्ह्यातील हॅण्डलूम मार्क प्राप्त सहकारी संस्था व हातमाग महामंडळ चे महाहॅण्डलूम यांनी सहभाग घेतला आहे. राज्यातील २७ हातमाग सहकारी संस्थांनी सहभाग घेतला असून विणकर कारागिरांनी तयार केलीले हातमागाचे कापड विक्रीस ठेवलेले आहे.

महाहॅण्डलूम चे उत्पादित निवडक हातमाग कापडावर ४० टक्के पर्यन्त सूट देण्यात येत आहे. या शासनाच्या उपलब्ध करून दिलेल्या संधीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा आणि दुर्मिळ हातमाग कापड मोठ्या प्रमाणात खरेदी करावे असे आवाहन प्रदर्शनाचे नियंत्रक ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन २० ऑक्टोबर ला राज्य वस्त्रोद्योग आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ लि. नागपूरच्या व्यवस्थापकीय संचालिका शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूरचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागपूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त व महा हातमागाच्या व्यवस्थापकीय संचालक शीतल तेली-उगले यांनी केले आहे. हातमागावर तयार होणारी उत्पादने ही कारागिरांची मेहनत आणि कारागीर यांचा अनोखा मेळ असल्याचे ते म्हणाले. याचा सन्मान करून नागपुरात आयोजित केलेले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी येथे आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रदर्शनातील विक्रीमुळे विणकरांच्या रोजगारात वाढ होण्यास मदत होणार असून, शहरातील रहिवाशांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार हातमाग कापड उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनात दररोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत नागरिकांना भेट देता येतील.

अस्सल सिल्क व कॉटन साड्या व घरगुती वापरासाठी लागणारे चादरी, टॉवेल, नॅपकिन आणि सिल्क व कॉटन कापड खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हातमागावर काम करणाऱ्या कुशल विणकर कारागिरांना नियमित रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागपूरकरांनी एकदा या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि अस्सल हात मागाचे कापड खरेदी करावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.

#Nagpur | दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र में महा हैंडलूम के विशेष हैंडलूम एक्स्पो का उद्घाटन

महा हैंडलूम के विशेष हैंडलूम एक्स्पो को नागपुरवासियों का व्यापक प्रतिसाद

#Nagpur । हातमाग प्रदर्शनाला नागपूरकरांचा उदंड प्रतिसाद, 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार प्रदर्शनी