Home Bollywood आलिया भट्टला रुग्णालयातून डिस्चार्ज; चिमुकलीची पहिली झलक आली समोर

आलिया भट्टला रुग्णालयातून डिस्चार्ज; चिमुकलीची पहिली झलक आली समोर

390

मुंबई ब्युरो : आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला. आई-वडील झाल्यानंतर आलिया आणि रणबीरच्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. घरात लहान परी आल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. आता कपूर कुटुंबानेही लिटिल प्रिन्सेसच्या स्वागतासाठी खास तयारी केली आहे. आज सकाळी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आई झाल्यानंतर आलियाची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.

रणबीर आणि आलियाच्या गाडीतून हॉस्पिटलमधून निघतानाचे फोटो समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रणबीर आणि आलिया त्यांच्या छोट्या देवदूतासह हॉस्पिटलमधून निघून गेले आहेत. आलिया आणि तिच्या छोट्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली. कपूर घराण्याची छोटी चिमुकली कशी दिसते हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर चाहत्यांना पहिली झलक पाहायला मिळाली. आलिया कारच्या आरशातून बाहेर पाहत असल्याचे चित्र सोशल मीडियावरही गाजत आहे. आलिया ब्लॅक आउटफिटमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. आई झाल्याचा आनंद आणि आराम आलियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.