नागपूर ब्युरो : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने खासदार सांस्कृतिक महोत्सव -2022 चे येत्या, 2 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या स्थळाचा भूमिपूजन समारंभ बुधवार,16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष व खासदार सांस्कृतीक महोत्सव आयोजन समिती चे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व कार्यालयाचे उद्घाटन आमदार मोहन मते यांच्या शुभहस्ते तसेच सर्व आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे तसेच, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती व डॉ. विकास महात्मे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून दहा दिवस स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांचे विविध मनोरंजक, प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होतील.
महोत्सवाच्या सफलतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, हाजी अब्दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, अॅड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.