नागपूर ब्यूरो : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ना.सु.प्र. निधीतून नागपूर शहरातील फुटाळा तलाव येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत कारंजे व मल्टीमिडीया शो प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे नागपूर शहराचे सौदर्यीकरणात भर पडलेली असून यामुळे पर्यटनामध्ये भविष्यात भर पडणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पात संगीताची धून व रंगीतमय प्रकाशावर फुटाळा तलावात उभारलेले कारंजे उडतात शिवाय अत्यंत प्रभाविपणे नागपूरचा इतिहास नाना पाटेकर यांचे आवाजात मराठी मध्ये, गुलजार यांचे आवाजात हिन्दी मध्ये तर महानायक अमिताभ बच्चन यांचे आवाजात इंग्रजी मध्ये सुद्धा सांगण्यात येतो यासाठी प्रकल्पाअंतर्गत वापरण्यात आलेले नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान व मांडणी लक्षात घेता सदर प्रकल्पाचे नामप्रविप्रा द्वारे Skoch Award 2022 करीता नामांकन करण्यात आले.
Skoch समूहाद्वारे विविध चाचण्यांन्वये प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यात आले. प्रकल्पाची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात आली व अंतिमतः दिनांक २३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाला Skoch Award Silver 2022 जाहिर करण्यात आला. सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 19 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
स्क्वॉच समूह हा १९४७ पासून कार्यरत असून सर्वसमावेशक वाढीव लक्ष केंद्रीत करून सामाजिक आर्थिक समस्या हाताळणारा भारतातील अग्रगण्य समूह आहे. सदर समूह सल्लागार सेवा, मिडीया, सार्वजनिक तथा व्यावसायिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. स्क्वॉच समूहाच्या ग्राहकांमध्ये प्रशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व ५०० पेक्षा अधिक व्यावसायिक क्षेत्रातील शिर्ष कॉर्पोरेशन्सचा समावेश आहे. या व्यतिरीक्त स्क्वॉच समूह आयटी, सुरक्षा, शहरी विकास व पायाभूत सोयीसुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्यरत आहे.
सदर प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर आयुक्त, अविनाश कातडे व अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर यांनी केले.