Home मराठी #Maha_Metro | लवकरच कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सेवा

#Maha_Metro | लवकरच कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सेवा

500

नागपूर ब्यूरो : महा मेट्रो नागपूर अंतर्गत सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान २६.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन होत असून लवकरच १३.५ किमी मार्गिकेवर मेट्रो ट्रेनचे संचालन सुरु होणार आहे. यात सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.५ किमी आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान ५ किमी मार्गिकांचा समावेश आहे.

सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावर मेट्रो सेवा सुरु झाल्याने या दोन्ही मार्गिकेवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असून या दोन्ही भागातील नागरिक वर्धा आणि हिंगणा मार्गाशी जुळतील.

आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन : उत्तर – दक्षिण मार्गिकेवरील सर्वात शेवटचे असे मेट्रो स्थानक सदर स्टेशन कामठी माहमार्गावर स्थित असून या मार्गावर सतत वाहनांची रहदारी असते, आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन सुरु झाल्याने कामठी, कन्हान परिसरातील नागरिक तसेच या स्टेशन परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मेट्रो सेवेचा लाभ होणार आहे.  कामठी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहनांची ये-जा येथून अविरत सुरुच असते. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कॉलेज, व्यापारी संकुले,बँक,शासकीय कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत. तसेच हा रस्ता उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. तसेच या मार्गावर रिजर्व बँक ऑफ इंडीया, कस्तुरचंद पार्क, सिताबर्डी किल्ला अश्या प्रमुख आणि ऐतिहासिक स्मारक आणि संस्थाने आहेत.

प्रजापती नगर मेट्रो स्टेशन पूर्व – पश्चिम मार्गिकेवरील सर्वात शेवटचे आणि मोठ्या प्रमाणत रहदारी असलेले मुख्य असे मेट्रो स्थानक प्रजापती नगर मेट्रो स्टेशन. या भागातून मोठ्या प्रमाणात बुटीबोरी(एमआयडीसी) आणि हिंगणा(एमआयडीसी) परिसरात दररोज नौकरी करिता ये – जा करतात. मुख्य म्हणजे स्टेशनच्या जवळ मोठी बाजारपेठ आणि भंडारा शहराला जाणारा रस्ता जुळला आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.  
सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.