Home Sports महाराष्ट्र एन्ड्युरन्स स्केटींग – 2022 मध्ये सान्वी सरोदे ची यशप्राप्ती

महाराष्ट्र एन्ड्युरन्स स्केटींग – 2022 मध्ये सान्वी सरोदे ची यशप्राप्ती

418

नागपूर ब्युरो: महाराष्ट्र एंन्ड्युरन्स स्केटींग ग्रृप च्या वतिने महाराष्ट्र एन्ड्युरन्स स्केटींग चॅम्नीयनशिप-2022 ही राज्यस्तरिय स्पर्धा खेापोली, जि. रायगड येथे दि. 10 व 11 डिसेबंर ला आयोजित करण्यात आली होती.या स्केटींग स्पर्धेमध्ये कु. सान्वी राजेश सरोदे हिने 10 वर्षाच्या आतील मुलींच्या गटात नागपुर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. खोपोली येथे घेण्यात आलेल्या स्केटींग चॅम्नीयनशिप-2022 च्या स्पर्धेत 2 मिनीट तसेच 1 मिनीट या प्रकारात कु. सान्वी राजेश सरोदे हिने दोन्ही स्पर्धेमध्ये काश्यपदक प्राप्त करत घवघवित यश प्राप्त केले आहे.या यशप्राप्तीमुळे सान्वी सरोदे हिचे महाराष्ट्र एंन्ड्युरन्स स्केटींग राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. कु. सान्वी सरोदे तिच्या यशाचे श्र्रेय तिचे आईवडील सौ मनिषा सरोदे,श्री राजेश सरोदे तसेच श्री साई स्केटींग ॲकेडमी, नरेद्रनगर चे संचालक व हेड कोच श्री. प्रंशात मालेवार सर तसेच अमोल सर व रुपल मॅडम यांना देत आहे.