Home मराठी Maha_Metro l नागपूर मेट्रो करता मैलाचा दगड; रायडरशिपने २ लाखांचा टप्पा पार...

Maha_Metro l नागपूर मेट्रो करता मैलाचा दगड; रायडरशिपने २ लाखांचा टप्पा पार केला

405

रात्री 8 वाजता 2,02,608 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक प्रवासी संख्या

नागपूर : २०२२ मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. आज (१ जानेवारी २०२३ – रविवारी) महा मेट्रो ची रायडरशिपआठ वाजे पर्यंत 2,02,608 इतकी होती. मेट्रो सेवा रात्री संपे पर्यंत हा आकडा वाढणार आहे. या वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा अंदाज घेत महा मेट्रोने मेट्रो फेऱ्यात आज करता वाढ केली आणि रात्री १०.३० पर्यंत सर्वच टर्मिनल स्टेशनवर मेट्रो सेवा दिली.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर महा मेट्रोने हा महत्वाचा टप्पा गाठला. नागपूर मेट्रो ने हा आकडा मेट्रो गाडीच्या
डब्यातील तसेच स्टेशन वरील गर्दी या वाढलेल्या रायडरशीपचे प्रमाण आहे.

11 डिसेंबर रोजी महा मेट्रोच्या दोन लाईनचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, म्हणजे १८ डिसेंबर रोजी, महा मेट्रोने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत दीड लाखाची रायडरशिप मिळवली होती. त्या नंतर २५ डिसेंबर रोजी नागपूर मेट्रोने १,६८,६३० इथवर मजल मारली होती.

प्रवाश्यांना नागपूर मेट्रोचे महत्व पटावे आणि प्रवासा दरम्यान त्यांचे मनोरंजन होण्याकरता मेट्रोतर्फे २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रायडरशिप अभियान आणि कार्निव्हल चे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत जादूचे प्रयोग, गाण्याचे कार्यक्रम, अनोख्या वस्तूंचे प्रदर्शन, मेट्रो संवाद असे अनेक उपक्रम राबवले आणि या सर्व प्रयत्नांना मोठ्या संख्येने मेट्रोने प्रवास करत नागपूरकरांनी एका प्रकारे याची पोच दिली.

याच शृंखलेचा एक भाग म्हणून, आज, म्हणजे २०२३ च्या पहिल्या दिवशी महा मेट्रो तर्फे फ्रिडम पार्क येथे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात बालगोपालांनी देखील हिरीरीने सहभाग घेतला होता.

रायडरशिपमध्ये झालेली वाढ हे दर्जेदार नियोजन, डिझाइन आणि संचालनाचा पुरावा आहे. मध्यवर्ती बिंदू म्हणून सीताबर्डी इंटरचेंजसह मार्गांची निवड ही आणखी एक महत्वाचा पैलू आहे की महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढत कल दिसून आला आहे. महा मेट्रोने संवाद आयोजित केली, माहिती आणि सहयोग केंद्र सुरू केले ही वस्तुस्थिती यामागील आणखी एक पैलू असल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

नुकत्याच सुरू झालेल्या दोन मार्गिकांवर प्रवाश्यांची गर्दी दुसऱ्या दिवसापासून अनुभवायला मिळाली. किंबहुना, गेल्या काही काळापासूनचा ट्रेंड पाहता, महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि या बाबींचा विचार करून आणि या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन, महा मेट्रोने सर्व स्तरांवर आवश्यक कर्मचारी तैनात केले होते.

मेट्रोच्या कामठी मार्ग तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिक प्रतिक्षा करीत होते. नागपूर मेट्रो आता शहराच्या चारही बाजूने सुरु झाली असून यामध्ये कॉलेज व शाळेत जाणारे विद्यार्थी, नौकरीदार तसे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत असून सकाळी ६ वाजता पासून ते रात्री १० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा नागरिकांकरता उपलब्ध आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी महा मेट्रो नागपूरकरांच्या सर्व सहकार्य आणि सहकार्याबद्दल आभार मानते.08 वाजता रायडरशिप