नागपूर ब्युरो : नागपूर येथे मार्च महिन्यात आयोजित होणाऱ्या जी-20-सी 20 परिषदेच्या आयोजनाबाबत गुरुवार ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक नागपूरच्या सह पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, जी-20 आयोजन समितीचे सौ. शेरपा स्वदेश सिंह, किरण डी . एम., वर्किंग कमेटी सदस्य अजय धवले आदी उपस्थित होते.
21 आणि 22 मार्च 2023 दरम्यान नागपूरात जी-20 परिषदेचे आयोजन होणार आहे. यात 27 देशांतील 60 प्रतिनिधींसह भारतातील जवळपास 140 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उदघाटनापासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत तसेच या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.