Home Nagpur Nagpur | पालकमंत्र्यांकडून विद्यार्थी आणि जवानांचे कौतुक

Nagpur | पालकमंत्र्यांकडून विद्यार्थी आणि जवानांचे कौतुक

378
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्यूरो: प्रजासत्ताक दिनाच्या कस्तुरचंद पार्क येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात जवानांचे आणि आजच्या पथसंचलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पालकमंत्र्यांनी त्यांना सन्मानित केले.

 

शहीद जवानांच्या वारसांना व अपंग जवानांचा ताम्रपट, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंगेश रामटेके या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच निलेश दमाहे, ले. कर्नल अमोल चौधरी, मेजर प्रतर्दन गोपाळ साखळकर, तल्हार विजय मनोहर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागपूर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर पत्नी व परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांनी विचारपूस केली.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

केंद्रीय गृहमंत्री पदक तसेच उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्काराबद्दल नागपूर शहरच्या सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आयजी छेरींग दोरजे सह सर्व पोलिस उपायुक्त व अधिकारी उपस्थित होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांच्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करीत पालकमंत्र्यांनी कौतुक केले.