Home Nagpur #Nagpur | पिपळा (बेसा) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न 

#Nagpur | पिपळा (बेसा) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न 

374

नागपूर ब्यूरो: पिपळा (बेसा) येथील मा. सरपंच नरेश भोयर जनसंपर्क कार्यालय येथे दिनांक रविवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री अजय बोढारे हे होते.

महाराजांच्या प्रतीमेला मालार्पण करून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जिवनचारीत्रावर अजय बोढारे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सरपंच नरेश भोयर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभु भेंडे, अजय हातीबेड, राजेंद्र राजुरकर, मधुकर सुरवाडे, अमोल धनुषकर, संजय बेले, सुनील चांदोरकर, नित्यानंद अन्नदाते, योगेश कोल्हे, भुषण हेडाऊ, राहुल काकीरवार, पवन राजवैघ, अमोल गुर्जर, कपिल कोसे, निलेश दाते, तनुज जाने, भावेश पारधी, संजय रेवतकर, रितेश भुजाडे, रंजीत दुर्गे, निलेश चौधरी, विवेक येरने, वैभव मेंढे, रोहीत भोयर, तन्मय भोयर उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन अंकुश धाडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन निखील भोयर यांनी केले.