Home मराठी Maha_Metro | मेट्रो स्टेशनात छत्रपति शिवाजी महाराजांची मिरवणूक साकारणार

Maha_Metro | मेट्रो स्टेशनात छत्रपति शिवाजी महाराजांची मिरवणूक साकारणार

398

– जी-20 परिषदेसाठी छत्रपती चौक स्टेशन येथे साकारली जात आहेत दृश्ये

नागपूर ब्यूरो : पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या जी-20 बैठकी करिता नागपुरात जोरात तयारी सुरु आहे. अश्यातच नागपूर मेट्रो तर्फे देखील उज्वल नगर, जय प्रकाश नगर आणि छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे विविध दृश्ये साकारली जात आहेत. या पैकी छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे विविध दृश्ये साकारली जात आहेत. मेट्रो मार्गिकेच्या खाली असलेल्या मीडियन येथे ही कलाकृती साकारली जात आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे साकारल्या जाणाऱ्या या शिल्पात महाराज गडावरून पायथ्याशी असलेल्या गावात जात आहेत असे दृश्य साकारले जात आहे. गडाखाली महाराजांचे सैन्य हत्ती, घोड्यांसह वाट बघत असल्याचे दर्शवले आहे. महाराजांचे मावळे आणि गावातील सुवासिनी महाराजांचं औक्षण करण्यासाठी त्यांची वाट पाहत आहेत असा संदर्भ लावून हे महाराज गडावरील पायऱ्या उतरून खाली येत आहेत असं हे शिल्प निर्मित होत आहे.

छत्रपती चौक मेट्रो स्थानकावर साकारल्या जाणाऱ्या या मीरवणुकीत महाराजांचे मावळे हातात विविध वाद्य घेऊन ते वादनास सिद्ध असल्याचे दर्शवण्यात आले आहे. मेट्रो मार्गिका खाली एकूण तीन कलाकृती अश्या प्रकारे साकारली जाणार आहे. एकूणच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अश्या प्रकारे नागपूर मेट्रो साकारत आहे.  (सदर देखावा हा मेंटल कलर मध्ये राहील)