कोल्हापूर ब्युरो: वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रचार प्रसिद्धी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर द्वारे कोल्हापूर शहरात व्ही.टी. पाटील स्मृती भवन, कमला कॉलेज परिसर, राजारामपूरी, मेन रोड, कोल्हापूर या ठिकाणी स्पेशल हॅण्डलूम एक्सपो 2023 या नावाने हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 10 ते 22 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी त्यांनी बोलताना अशा भावना व्यक्त केल्या की, या प्रदर्शनास विविध जिल्ह्यातून आलेल्या विणकर कारागिरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडाचे उत्पादने विक्रीस ठेवलेले असल्याने विणकर कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, त्यांचे कापडाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणेसाठी कोल्हापूर शहरात आयोजित हाेत असल्याने एकदा तरी भेट देवून कापड खरेदी करावे, असे आव्हान त्यांनी केले.
विणकर सहकारी संस्थांनी तयार केलेले हातमागाचे चादरी, टॉवेल, नॅपकीन, सतरंजी, पंचे, बेडशिट्स, पिलो कव्हर तसेच नैसर्गिक धागा व रेशीम कोसा धाग्यापासून व बांबू बनाना ब्लेडेड फॅब्रिक्स व साड्या विक्रीस ठेवलेल्या आहेत. सर्व प्रकारचे हातमाग कापड खरेदीवर सहभागी संस्था कडून 20 टक्के सुट देण्यात येत आहे.
प्रवेश विनामूल्य असून पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रदर्शन दररोज सकाळी 11 से रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्यक्ष उत्पादकांकडून वाजवी दरात खरेदी करण्याची संधी कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी वस्त्रोद्योग विभागाचे माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी कोल्हापूरकरांनी एकदा तरी या प्रदर्शनाला अवश्य भेट देवून हातमागाचे कापड खरेदी करावे, असे आव्हान महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडल मर्या. नागपूरचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभूळकर यांनी केले आहे. उद्घाटन प्रसंगी नंदकुमार तुळजापूरकर व सहभागी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#आत्मनिर्भर । फॅशन डिझायनर शुभांगी यांनी केले 70 मुलींना आत्मनिर्भर