अस्सल सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या भव्य प्रदर्शन व विक्रीला मिळत आहे नागपूरकरांची पसंती
नागपूर ब्युरो : जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या नानाविध प्रकाराच्या दागिन्यांनी सुसज्ज अशा दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीची सुरुवात सोमवार, 10 एप्रिल ला रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे झाली. याप्रसंगी शहरातील नगरसेविका पल्लवी शामकुळे, माजी नगरसेविका प्रगती पाटील, आय क्लीन नागपूरच्या संचालिका वंदना मुजुमदार, पेडणेकर ज्वेलर्सचे योगेश पेडणेकर, व्यवस्थापक माने, सागर हळदणकर, व्हीआयएच्या सदस्या वंदना शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. हे प्रदर्शन १३ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. नागपूरकरांनी या भव्य प्रदर्शन व विक्रीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दादरचे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स म्हणजे ६० वर्षांपूर्वी सुरू झालेली एक सुवर्णमय परंपरा,जी जपली आणि वाढवली तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर आणि ते देखील त्यांच्या आवडी निवडी जपून. ज्येष्ठ समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक समाजश्रेष्ठी स्व.जगन्नाथ (भाई) गंगाराम पेडणेकर यांनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स ह्या उद्योगसमूहाचे स्थापना केली. पिढ्यानपिढ्या चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणारे दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करीत आहेत. महाराष्ट्र व गोव्यात १७ शाखांमार्फत ग्राहकांना सेवा पुरवीत आहे.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा “राजेशाही संग्रह” हा पारंपारिक व अत्याधुनिक दागिन्यांच्या शैलींचा अनोखा मिलाप आहे. इथे चित्तक, बकुळी हार, लक्ष्मी हार,शिंदे शाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजू बंद, कमर बंद,तन्मणी, वेणी, झुमके आणि अस बरंच काही आहे. राजेशाही संग्रहातील प्रत्येक दागिन्यांच्या डिझाईन पासून ते बनावटीपर्यंत प्रत्येक बाबींवर विशेष लक्ष पुरविले जाते म्हणूनच राजेशाही संग्रह आहे.