नागपूर ब्युरो: कोणत्याही राजकीय पक्षाला बळी न पडता संघटीत होऊन बाबासाहेबांच्या विचारांना अंगीकृत करा आणि समाजातील कोणत्याही स्तरातील उपेक्षितांना शक्य ती मदत करा..हीच खरी यादिनी बाबासाहेबांना आदरांजली होय असे परखड मत ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांनी स्वामिधामनगरी, घोगली येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी पिपळा – घोगलीचे माजी सरपंच नरेश भोयर, बेसा – बेलतरोडीचे सुरेंद्र बानाईत, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस.आर. नेहारे , सचिव राजेश सोनटक्के, मधुकर सुरवाडे, किशोर रिंगणे, शशी शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आपला देश एकसंघ आहे आणि त्यामुळेच सुचारू पद्धतीने देश चालत आहे, याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे असे मत नरेश भोयर यांनी व्यक्त केले. नेहारे यांनीदेखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सोनटक्के यांनी तर आभार मनोज फुलपाटील यांनी मानले. कार्यक्रमाला घोगली परिसरातील महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर वासनिक, शंकर खाडे, हरीश भगत, रमेश कदम, धनविजय, अशोक सांगोळे, कांतीलाल मोठे, निशित थुलकर, अशोक लढे, लोणारे, सुरेश फुले, वानकर, यशवंत मेश्राम, अमोल पाटील आदींनी परिश्रम घेतले.