नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फ़ेज – 2 चा शिलान्यास ११ डिसेंबर २०२२ रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला असून नागपूर मेट्रो फ़ेज – 2 संदर्भात सामंजस्य करार महा मेट्रो- महाराष्ट्र शासन-भारत सरकार असा त्रिपक्षीय करार संपन्न झाला या त्रिपक्षीय करारमुळे प्रकल्पाकरिता लागणारा निधी मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल व प्रकल्पाला आणखी जलद गती प्रदान होईल. उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रो ने या पूर्वीच फ़ेज – 2 संदर्भात विविध कार्याकरिता निविदा प्रसारित केल्या आहेत.
• नागपूर मेट्रो रेल फ़ेज – २ प्रकल्पाची विशिष्टये :
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फ़ेज – २, ची लांबी ४३.८ कि.मी असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्प फ़ेज फेज-२ ला ८ जानेवारी २०१९ रोजी राज्य सरकार ने मंजुरी प्रदान केली. या प्रकल्पाची अनुमानित लागत ६७०८ कोटी एवढी आहे.
• आटोमोटिव्ह चौक ते कन्हान :
लांबी : १३ कि. मी. स्टेशन : पिली नदी,खसारा फाटा,ऑल इंडिया रेडियो,खैरी फाटा,लोक विहार,लेखा नगर,कॅन्टोन्मेंट,कामठी पोलीस स्टेशन,कामठी नगर परिषद,ड्रॅगन पॅलेस,गोल्फ क्लब,कन्हान नदी
• मिहान ते बुटीबोरी ईएसआर :
लांबी : १८.७ कि. मी. स्टेशन: ईको पार्क स्टेशन,मेट्रो सिटी स्टेशन,अशोकवन,डोंगरगांव,मोहगांव,मेघदूत सिडको,बुटीबोरी पोलीस स्टेशन,म्हाडा कॉलोनी,एमआयडीसी – केईसी,एमआयडीसी – ईएसआर
• प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर :
लांबी : ५. ५ कि. मी. , स्टेशन: पारडी,कापसी खुर्द, ट्रांसपोर्ट नगर
• लोकमान्य नगर ते हिंगना:
लांबी : ६.६ कि. मी. , स्टेशन: हिंगना माउंट व्ह्यू,राजीव नगर,वानाडोंगरी,एपीएमसी,रायपूर,हिंगना बस स्टेशन,हिंगना.