Home Nagpur #Maha_Metro l मानस चौक ते इन्स्टिट्युट ऑफ सायंस पर्यतच्या भुयारी मार्गाचे उद्या...

#Maha_Metro l मानस चौक ते इन्स्टिट्युट ऑफ सायंस पर्यतच्या भुयारी मार्गाचे उद्या भूमिपूजन

169

• केंद्रीय मंत्री मा.श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

• सीआरएफ अंतर्गत महा मेट्रो तयार करणार 870 मीटर लांब भुयारी मार्ग

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (14 ऑक्टोबर 2023) झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळील मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.कार्यक्रम सकाळी 11 वाजता झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन याठिकाणी होणार असून या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.

सदर निर्माण कार्य हे सेंट्रल रोड फंड (CRF) अंतर्गत असून निर्माण कार्य महा मेट्रोच्या वतीने केल्या केल्या जाईल. प्रस्तावित भुयारी मार्ग हा 870 मीटर लांब असून याठिकाणी तीन प्रवेश(Entry)/निर्गमन(Exit) राहणार आहे.

या भुयारी मार्गामध्ये तीन बॉक्स – 5.5 मी X 5.5 मी (प्रत्येकी २) आणि 10.मी X 5.5 मी (एक) अशी राहणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत रु. 79.67 कोटी एवढी आहे या भुयारी मार्गामुळे मानस चौक ते लोखंडी पूल (लोहा पुल) येथील गर्दी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. सदर भुयारी मार्ग हा वर्धा रोड (राष्ट्रीय महामार्ग) च्या दोन्ही बाजूंनी असेल.

प्रस्तावित भुयारी मार्गामुळे भवन शाळा, बीएसएनएल कार्यालय, वनविभाग कार्यालय यासारख्या नामांकित संस्थांसह जवळील परिसरातील गर्दी कमी करण्यात मदत होईल.

उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रोने लोहापुल येथील अंडरपास आणि राम झुला ते एलआयसी आणि आरबीआय चौकी पर्यंतचा वाय- शेप उड्डाणपूलाचे कार्य केले असून या वर्षाच्या सुरुवातील याचे उद्घाटन देखील करण्यात आले या सोबतच महा मेट्रोने नागपूर रेल्वे स्टेशन समोरील उडाणपूल पाडून प्रस्तावित रस्त्याचे निर्माण कार्य हाती घेतले आहे.

मानस चौक,लोखंडी पूल (लोहा पुल), झिरो माईल, वर्धा रोड, अंसारी रोड यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असलेल्या संपूर्ण परिसरात सर्वत्र वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते प्रस्तावित भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर या भागातील गर्दी कमी होण्यास मदत होईल.