Home Naxal #Naxal_Menance | गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलाने संयुक्त कार्यवाहीत केले एका जहाल...

#Naxal_Menance | गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलाने संयुक्त कार्यवाहीत केले एका जहाल माओवाद्यास अटक

132

– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 6 लाख रुपयांचे बक्षीस.

गडचिरोली : नागरिकांची हत्या गडचिरोली जिल्हा सन 1980 पासुन माओवादाच्या प्रभावाने ग्रासलेला आहे. या कालावधीत माओवाद्यांनी निरपराध करणे, जाळपोळ करुन विकास कामांमध्ये अडथळा आणणे तसेच विविध कंत्राटदारांकडु न खंडणी वसूल करणे इ. दे शविघातक कृत्य केलेले आहे . हे सर्व साध्य करण्यासाठी माओवाद्यांकडे सुरक्षित पुरवठा साखळी असणे आवश्यक आहे.

दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी नामे मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहि तीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन 2023 साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 13, 16, 18 (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

सदर जहाल माओवादी मेस्सो कवडो हा माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तो नेहमी माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत असल्याने त्याची अटक गडचिरोली पोलीस दलासाठी महत्वाची ठरलेली आहे . तो दिनांक 14/10/2023 रोजी अटक झालेला जहाल माओवादी नामे डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्या सोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने माओवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.

6 लाख रूपयाचे बक्षीस

महाराष्ट्र शासनाने मेस्सो गिल्लू कवडो याच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे . सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा, मा. अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. मा अपर पोलीस अधीक्षक, अहे री श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी श्री. बापूराव दडस आणि सीआरपीएफ ई/191 बटालीयनचे असिंस्टंट कमांडन्ट श्री. मोहीत कुमार यांचे नेतृत्वात पार पडली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे .