Home Farmer वखार महामंडळाच्या गोदामात “वखार आपल्या दारी ” अभियानाची सुरुवात

वखार महामंडळाच्या गोदामात “वखार आपल्या दारी ” अभियानाची सुरुवात

116

नागपूर ब्युरो: काटोल येथील वखार महामंडळाच्या गोदामात “वखार आपल्या दारी “या अभियानाची सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यीत स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वखार आपल्या दारी या अभियानाची पहिली कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमास सुमारे ८० हून अधिक शेतकरी, शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुभाष पुजारी, केंद्र प्रमुख मुकेश कोकर्डे, प्रशांत चासकर राज्य व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, दिपक बेदरकर, विभागीय व्यवस्थापक अमरावती विभाग, उमेद अभियान, कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी विक्रम भवारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल भैसवार, महिला आर्थिक विकास महामंडळचे व्यवस्थापक व महिला बचत गट या कार्यक्रमास उपस्थित होते.

काटोल येथील जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने चालू खरीप हंगामातील काढणीच्या काळात शेतमाल तात्काळ न विकता वखार महामंडळाच्या गोदाम साठवून गोदाम पावती योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पंनात वाढ करावी असे आवाहन सुभाष पुजारी विभागीय व्यवस्थापक नागपूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांनी केले.