Home हिंदी कोविड-19 : दंदे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त गर्भवतींची प्रसूती

कोविड-19 : दंदे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त गर्भवतींची प्रसूती

795

नागपूर : कोरोनाच्या उद्रेकामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले असताना कोविड सेंटर असलेल्या नागपुरातील रविनगर चौक परिसरातील डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाग्रस्त गर्भवतींनी आज (18 सप्टेंबर) बाळांना जन्म दिला.

डॉ. दंदे हॉस्पिटलच्या संचालक तसेच प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांच्या नेतृत्त्वातील टीम ने ही किमया साधली. एकाच दिवशी दोन गर्भवतींची प्रसूती ही बाब डॉ. दंदे हॉस्पिटलसाठी नवी नाही. मात्र दोन्ही माता कोरोनाग्रस्त असल्यामुळे या घटनेला वेगळे महत्त्व आहे. यातील एक मातेला आयव्हीएफ प्रकारातून गर्भधारणा झाली होती. त्यामुळे या प्रस्तूतीचे मोल खूप जास्त होते.


ये भी पढ़ें – 
नागरिकों की इच्छा पर निर्भर होगा नागपुर का जनता कर्फ्यू
अंकित गोयल गढचिरोली के नए एसपी, शैलेश बलकवडे का कोल्हापुर तबादला
कोविड- 19 : महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री नितिन राऊत भी पॉजीटिव


ही नॉर्मल डिलीव्हरी Labour Analgesia (वेदनारहित) प्रक्रियेतून करण्यात आली. या मातेला कोरोनाची लागण असली तरीही कुठलीही लक्षणे नाहीत. तर दुसऱ्या गर्भवतीचे सीझर करण्यात आले. दोन्ही बाळांची व मातांची प्रकृत्ती उत्तम आहे.

डॉ. सीमा दंदे यांच्यासह डॉ. वैशाली चांगोले, डॉ. निलेश माथनकर, डॉ. मिलींद मंडलिक, गीता सिस्टर यांच्यासह इतर रुग्णालय कर्मचाऱ्यांचा या टीममध्ये समावेश आहे. कोरोनाग्रस्त गर्भवतींचा उपचार आणि प्रसूती हा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. गर्भवतींच्या मनावरही मोठे दडपण आले आहे. पण आजची ही घटना इतर गर्भवतींना दिलासा देणारी आहे.