Home Maharashtra #Maharashtra | मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

#Maharashtra | मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्या 16 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. उद्या सकाळी 10.30  वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती ठरवली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे.