-निवडणूक अधिकाऱ्यांनी 220 किट बॅग केले जब्त
नागपुर : राज्यात विधानसभा निवडणुक प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवित आहे. अशातच पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांनी उमेदारांना आकर्षित करण्यासाठी रेशन किट वाटप करण्याचा प्रकार केला. मोतीबाग येथील मंगलवारी मार्गावरील सेंट्रल रेल्वे कॉलोनीत शासकीय क्वॉर्टर राशन किट मोठा साठा असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे नोडल अधिकारी राजीव गौतम व मनोज गेडामसह यांनी तात्काळ पोहचून याची सूचना जरीपटका पोलिसांना दिली.
यावेळी 220 किलो वजन असलेल्या 220 किट बॅग जब्त करण्यात आले. आचार संहितेचे उल्लंघन करून जिचकार यांनी रेशन किटमध्ये आपल्या अपक्ष उमेदवारीचे चुनाव चिन्हाचे पत्रक टाकून प्रचार करण्याचा प्रकार केला. या सर्व प्रकारचे व्हिडीओ शहरात व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे शासकीय क्वॉर्टरमधून होत असलेल्या या प्रकारामुळे प्रचाराच्या मोहिमेत सरकारी नोकरदारही लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळत एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम नागपुरात विजय मिळविण्याकरिता झोपडपट्टीतील गरीब मतदारांना प्रलोभन देण्यासाठी नरेंद्र जिचकार यांनी राशन किट तयार करण्याची शक्कल लढविली. त्यानुसार मोतीबाग येथील मंगलवारी मार्गावरील सेंट्रल रेल्वे कॉलोनीत शासकीय क्वॉर्टर हे सुरक्षित असल्याने तेथे शेकडो किट ठेवण्याचे गोदाम तयार केले. त्यानुसार रविवारी राशन किटची खेप एमएच-40/बीएल-6531 क्रमांकाच्या गाडीतून राशन किट उतरविण्यात आले. रविवारी दुपारी साडे तीनच्या दरम्यान एका जागरूक मतदाराने याचा विडियो तयार करून याची माहिती नोडल अधिकारी राजीव गौतम यांना मिळाली. त्यानंतर जरीपटका पोलिसांना बोलवून पुढील कार्यवाही निडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. अश्याच प्रकारचे इतरही ठिकाणी वाटप करण्यात आल्याचे माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाचे अधिकारी पश्चिम नागपुर क्षेत्रातील आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या या किटच्या शोधात आहे.
बॅगमध्ये मिळाले प्रचाराचे पत्रक
हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिय मतदारांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जिचकार यांनी मोहन नगर, कडबी चौक, गड्डीगोदाम, नई बस्ती, गिट्टीखदान, मकरधोकडा परिसरातील झोपडपट्टीवासीयांना या किट पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जिचकार यांना भाजपाकडून कोट्यावधी रुपयांच्या जोरावर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तसेच ज्या ठिकाणी गरीब लोकांना आकर्षित करण्यासाठी राशन किट तयार करून त्यात आपले पत्रक टाकून प्रचार राबवित आहे. याकरिता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पैशाचे प्रलोभन देऊन कामाला लावले आहे.