जीआयआयएसची नागपुरातील “ग्लोबल इंडियन स्टार्स” प्रतिभा शोध स्पर्धा संपन्न
नागपूर ब्यूरो : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस), लावा, नागपूर द्वारा आयोजित “ग्लोबल इंडियन स्टार्स” गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 30 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेत 7 ते 10 वयोगटात अर्णव जुनारकर, नाव्या पानके आणि श्रावणी कांबळे यांने, तसेच 11 ते 16 वयोगटात श्रावणी खंडाळे, डॉर्फी जनबंधू आणि ऐश्वर्या बरगट यांनी बाजी मारली.
स्पर्धेचा अंतिम सोहळा अत्यंत चुरशीचा झाला, जिथे 1500 हून अधिक स्पर्धकांमधून 20 स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. या स्पर्धेच्या निर्णायक पॅनेलमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शेखर रावजियानी यांच्यासह प्रीयंका बर्वे आणि अंबी हे कलाकार होते.
कार्यक्रमात शेखर रावजियानी यांनी शहरातील संगीत प्रतिभेचे कौतुक करताना सांगितले, “नागपूर हे संगीत प्रतिभेचे भांडार आहे. युवकांनी आपला अभ्यास आणि जीवनातील प्रत्येक पैलू समर्पणाने आणि समतोलाने पूर्ण करावा. त्याचप्रमाणे त्यांना त्यांचे आवडीचे क्षेत्र देखील जोपासावे.” रावजियानी यांनी विजेत्यांना पुढील संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करत, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याचे मार्गदर्शन दिले.
स्पर्धेतील विजेत्यांना ₹4 लाखांपर्यंतचे आकर्षक बक्षिसे देण्यात आली, तसेच जीआयआयएस नागपूर येथे शिष्यवृत्ती आणि ग्लोबल स्कूल ऑफ म्युझिक अंतर्गत शेखर रावजियानी यांचे मेंटरशिप मिळविण्याची अनमोल संधीही प्राप्त झाली.
ग्लोबल स्कूल्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. अतुल टेभुर्णीकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि “नागपूर हे माझे मूळ गाव आहे. हे शहर प्रतिभावान तरुणांनी भरलेले आहे” असे सांगितले. तसेच भविष्यात अशा आणखी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, यामुळे नागपूरच्या स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रतिभेचा प्रसार करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल, अशी आश्वासन त्यांनी दिली.
“ग्लोबल इंडियन स्टार्स” स्पर्धेने संगीत क्षेत्रात नवा बेंचमार्क सेट केला आहे. या स्पर्धेतील यशाने शहरातील तरुण कलाकारांसाठी एक उज्जवल भविष्य निर्माण केले आहे, असे मानले जात आहे. जीआयआयएसने हे आयोजन करून नागपूरच्या संगीत क्षेत्रात एक मोठा बदल घडवला आहे, जे शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.