Home Nagpur #Nagpur | जुबिन नौटियालच्या रॉकिंग परफॉर्मन्स ने तरुणाई बेधुंद

#Nagpur | जुबिन नौटियालच्या रॉकिंग परफॉर्मन्स ने तरुणाई बेधुंद

38
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार समारोप

नागपूर ब्युरो : युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या जुबिन नौटियाल यांच्‍या ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ ने खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्‍या पर्वाचा शानदार समारोप झाला. जुबिन नौटियालच्या रॉकिंग परफॉर्मन्स ने तरुणाई बेधुंद झाली. दुपारी बारा वाजेपासून पटांगणाबाहेर तरुणांच्या रांगा बघायला मिळाल्या. पटांगण खचाखच भरून होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर मागील दहा दिवसांपासून नागपूरच्‍या रसिकांनी वैविध्‍यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेतला. सोमवारी महोत्सवाचा समारोप करताना कैसे जिऊंगा तेरे बिना, ना चैन से जीने दे, किन्ना सोणा तेणू रब ने बनाया, दुवा ना कोई, के राता लंबिया लंबिया रे, हा मुझे प्यार है तुमसे हा, तुम धडकन मैं दिल, तुजको है तुझसे राबता, अशा अनेक गाण्यावर तरुणाई थिरकली.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

चार वर्षांपूर्वी नागपुरात आलो होते. आज परत नितीन गडकरी यांच्‍यामुळे परत आपण भेटलो आहोत, असे जूबीन म्हणाला.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्‍या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्‍कार भारतीच्‍या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, राज्‍यमंत्री अॅड. आशीष जयस्‍वाल यांच्‍या उपस्थित दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur