Home Nagpur #Nagpur | अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5000 रुपये वरून...

#Nagpur | अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5000 रुपये वरून 25 हजार रुपये करू

62
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती

वरिष्ठ अभिनेता अनुपम खेर सोबत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषद सदस्य चंद्रशेखर मोहिते

नागपुर ब्यूरो : रस्ते अपघात झाल्यानंतरच्या ‘गोल्डन अवर ‘ मध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे 5 हजार रुपये दिले जातात या रकमेमध्ये वाढ करून ती 25 हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नागपूरच्या वनामती सभागृहामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना मुलाखत देताना गडकरी बोलत होते.

अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कुठलेही प्रश्न विचारत नाहीत उलट या व्यक्तींना 5 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात .या रकमेमध्ये आपण वाढ करणार असल्याचे सांगून संसदेने या अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी ‘गुड सेमेरीटन ऍक्ट ‘ पारित केला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

समाजातील स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक यांनी रस्ते सुरक्षा संदर्भात पुढाकार घेऊन काम करावे असं आवाहन त्यांनी केले .रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

आपल्या देशामध्ये 10 हजार विद्यार्थी हे शाळेच्या आजूबाजूच्या सदोष ट्रॅफिक व्यवस्था तसेच चौकाची रचना यामुळे अपघाताला बळी पडतात 30 हजार व्यक्ती बिना हेल्मेट मुळे दगावतात अशी माहिती गडकरींनी दिली .नागपूरच्या अजनी मध्ये 25 वर्षांपूर्वी खूप अपघात होत असत परंतु या चौकातील रस्ते अभियांत्रिकीच्या माध्यमातून सुधारणा केल्यामुळे आता 25 वर्षात येथे एकही अपघात झाला नाही असे त्यांनी सांगितले . नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार तसेच रोडमार्क या संस्थेने अपघात प्रवण स्थळ दुरुस्त केले असून नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या 48% नी कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा बाबत प्रश्न विचारले असता गडकरींनी त्यांच्या उत्तरांचे समाधान देखील केले . या कार्यक्रमाला नागपूरचे वाहतूक पोलीस आयुक्त अर्चित चांडक,राज्य परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी , रस्ते सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते उपस्थित होते.