Home Business #Nagpur | पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन

#Nagpur | पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन

17

नागपूर ब्युरो: जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर, मॉडेल करीअर सेंटर, नागपूर, शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, काटोल तसेब लाईट हाउस कम्युनिटी फाउडेशन, नागपूर यांचे संयुक्त विदयमाने गुरूवार दि.१३ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन, कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोल, जि. नागपूर येथे सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये NSSL Pvt. Ltd. Nagpur, Jayaswal Necco Industries Pvt. Ltd. Vaibhav Enterprises Nagpur, Colossal Skills Pvt. Ltd. Mahachai Pvt. Ltd. Nagpur, SBI Life Manishnagar, Nagpur, The Universal Group Associate, Nagpur, Utkarsh Small Finance Bank, Pouses Management Services Pvt. Ltd.Nagpur, Jaika Motors, Nagpur, Talentcorp Solution Pvt. Ltd., Horizon India Group, Replay International, Nagpur, Place Assured Consultants Pvt. Ltd. Nagpur., Muthoot Finance, Nagpur इत्यादी कंपन्या मार्फत ६०० पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आटीआय, डिप्लोगा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची प्रार्थमिक निवड केली जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, याव्दारे जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज, तसेच राजभूषण श्रीवास, यंग प्रोफेशल, गोंडेल करिअर सेंटर, नागपूर यांनी केले आहे.

नागपुर में खादी महोत्सव को जबर्दस्त प्रतिसाद