Home हिंदी नवरात्र उत्सवाच्या गाईडलाईन्स तातडीने जाहीर करा : आ.कृष्णा खोपडे

नवरात्र उत्सवाच्या गाईडलाईन्स तातडीने जाहीर करा : आ.कृष्णा खोपडे

740

नागपूर ब्यूरो : नवरात्र उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असून विशेषत: महिलांचा या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. अनेक संस्था-संघटना देखील मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवाचे आयोजन करतात. तसेच या उत्सवावर मूर्तिकार, डेकोरेशन व अनेक कारागीर यांचा रोजगार देखील अवलंबून असतो. एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी नवरात्र उत्सवाला शिल्लक असून राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारची गाईडलाईन्स जाहीर न झाल्यामुळे अनेक आयोजक अडचणीत आहे. तसेच राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानात संभ्रमाची स्थिती आहे. सर्वजण कोविड नियमाचे पालन करण्यास तयार असून शासनाच्या गाईडलाईन्सच्या प्रतिक्षेत आहे.

कोविडच्या काळात आतापर्यंत आपण अनेक उत्सव अगदी नियमाचे पालन करून साजरे केले व राज्याच्या संस्कृतीचे रक्षण देखील केले. त्याच धर्तीवर लवकरात लवकर गाईडलाईन्स जाहीर केल्यास संस्था-संघटनांना व देवस्थानांना तयारी करणे सोयीचे होईल, आ. खोपड़े यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून कोविड नियमाचे पालन करून राज्याची संस्कृती जोपासता येईल, या दृष्टीने लवकरात लवकर गाईडलाईन्स जाहीर कराव्यात, अशी मागणी आ. कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).