अमरावती ब्यूरो : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाबाधित रूग्ण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिरला आणि पत्रकारांमध्ये एकच धांदल उडाली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संदर्भात अमरावती विभागाच्या कोरोना संसर्गाच्या स्थिती संदर्भात आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण हा चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत शिरला त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
रुग्णालयात दाखल न केल्याने आला होता
अमरावती शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याने तो येथे आला असलाचे त्याने सांगितले. तर आपल्याला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटायचे असल्याचा तो आग्रह करत होता. त्यामुळे काही वेळ याठिकाणी तारांबळ उडाली होती. रुग्णाला दाखल करण्यासाठी प्रशासनाने खूप प्रयत्न केले पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी विनवणी करूनही तो हटला नाही. शेवटी पत्रकार परिषद संपल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात नेण्यात आले.
- वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).