Home हिंदी प्रलंबित वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचा एल्गार

प्रलंबित वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचा एल्गार

781

7 ॲाक्टोबर पर्यंत वेतन न झाल्यास 9 तारखेला राज्यभर आत्मक्लेश उपोषण आंदोलन

नागपूर ब्यूरो: कोविड 19 च्या महामारीत एसटी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना तीन तीन महीने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना, निधी नसल्याचे कारण सांगुन राज्यसरकारकडून मदत मागितली आहे परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटननेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या 7 तारखेपर्यंत जुलै ॲागष्ट दोन महीन्यांचे प्रलंबित वेतन व सप्टेंबर महिन्यांचे देय वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधीकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत. ही माहिती अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आत्मनिर्भर खबर डॉट कॉम ला प्रसिद्धि पत्रका द्वारे दिली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).