Home हिंदी लोक बिरादरी प्रकल्पाने वृक्षारोपण करुन साजरी केली गांधी जयंती

लोक बिरादरी प्रकल्पाने वृक्षारोपण करुन साजरी केली गांधी जयंती

784

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती च्या निमित्ताने सर्वच ठिकाणी वेग वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिलयात देखील यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत.

महात्मा गांधी जयंती आणि वन्यजीव सप्ताह निमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड येथील लोक बिरादरी प्रकल्प,हेमलकसा येथे शुक्रवार (2 ऑक्टोबर) ला वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे सुद्धा उपस्थित होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमात आमटे कुटुंबातील सदस्यांसोबतच लोक बिरादरी प्रकल्पातील सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी मोठ्या आनंदाने वृक्षारोपण केले.

अनिकेत आमटे यांनी दिलेल्या माहिती नुसार यावेळी विविध प्रकारची 100 वृक्ष लावण्यात आली. विवेक दुबे आणि श्रमदान टीम ने या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).