Home हिंदी सतत सहा वर्षांपासून उत्कृष्ठ निकाल देणारे इनसाइट ठरले नं.1 क्लासेस

सतत सहा वर्षांपासून उत्कृष्ठ निकाल देणारे इनसाइट ठरले नं.1 क्लासेस

1538

नागपूर/चंद्रपूर ब्यूरो : कोरोनाच्या संक्रमण काळात देखील इनसाइट (IINSIGHT) च्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करून भरघोस यश प्राप्त केले आहे. इनसाइट क्लासेस साठी 2020 हे वर्ष सर्वोत्कृष्ठ ठरले आहे. तब्बल 11 विद्यार्थ्यांनी JEE-ADV. परीक्षेत चांगला ऑल इंडिया रैंक (AIR) प्राप्त केला आहे. हे विद्यार्थी IIT/IIIT/NIT साठी पात्र ठरू शकतात, एकाच क्लासेस मधून एवढा चांगला निकाल खरच कौतुकास्पद आहे.

हर्षल वाकडे (AIR-858), राहुल टेंभुर्णे (AIR-867), हिमांशु करमनकर (AIR-1848), राधा यदागिरी (AIR-2360), वंशिता टेंभुर्णे (AIR-2499), सम्यक मेश्राम (AIR-2975), तरूण पाल (AIR-3829), प्रियांशु राउतकर (AIR-6625), प्रथम मिरदोत्तीवार (AIR-7845), पराग पिपरेवार (AIR-8138), धृण मिश्रा (AIR-11254) या विद्यार्थ्यांनी इनसाइट ची उत्कृष्ठ निकालाची परंपरा अखंडीत जपली.

इनसाइट चे संचालक सुरज अय्यर म्हणतात की जिद्द, चिकाटी आणि कठीन परिश्रम घेण्याची तयारी असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. त्यांनी सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक और आपल्या प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन देखिल केले आहे.
सुरज अय्यर म्हणतात की कोरोना चा संसर्ग खूप वाढलेला असतांना आमच्या प्राध्यापकांनी खूप परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी क्लासेस, टेस्ट सीरिज च्या माध्यमातून मार्गदर्शन करीत राहीले. त्यामुळेच आज आमचा निकाल सर्वोत्कृष्ठ लागलेला आहे.

ऑनलाइन क्लासेस नियोजनबद्ध पद्धतीने घेणारे इनसाइट हे चंद्रपुरातील एकमेव क्लासेस असून आता 12 वी मध्ये असणारे व 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होत आहे. नियोजनबद्ध वेळापत्रक, दररोज सर्व विषयांचे वर्गामधून सरळ ऑनलाइन प्रक्षेपण, पीडीएफ स्वरूपात नोट्स, डाउट सेशन, साप्ताहिक ऑनलाइन एक्जाम, रेकॉर्डेड विडियो. या सर्व नियोजनामुळे अभ्यासक्रम सुरळीत सुरू आहे. इनसाइट मध्ये विद्यार्थ्यांसाठी डे बोर्डिंग, अप डाउन आणि भव्य कैम्पस ची सुविधा देखील आहे.

इनसाइट चे संचालक सुरज अय्यर म्हणतात, जे विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजीनियर बनण्याचे स्वप्न बघत आहेत पण कोरोना मुळे आधी 12वीच करू, मग बघू असे विचार करीत असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही. 11 वी आणि 12 वी सोबत जेईई/नीट ची तयारी करावीच लागेल. अजून वेळ गेलेली नाही, आत्ताच प्रवेश घेता येईल.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).