Home हिंदी खा. कृपाल तुमाने बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेचे “स्टार प्रचारक”

खा. कृपाल तुमाने बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेचे “स्टार प्रचारक”

709

नागपूर ब्यूरो : रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी “स्टार प्रचारक” म्हणून निवड करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार असून शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह 20 शिवसेना नेते प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे कृपाल तुमाने हे बिहारमध्ये शिवसेनेचा प्रचार करणारे विदर्भातील एकमेव शिवसेना नेते आहेत.


बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढविणार


बिहार विधानसभेच्या 50 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी यापूर्वीच दिली होती. यानंतर आज गुरुवारी शिवसेनेने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात रामटेकचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्यासह कृपाल तुमाने यांच्या नावांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मागणी होती

स्टार प्रचारकांच्या यादीत सामील असलेले शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले, शिवसनेचे बिहार मध्ये मजबूत संघटन आहे, बिहारमध्ये निवडणूक लढवावी ही मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. आम्ही केवळ 50 जागा लढविणार असलो तरी त्या पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. बिहारमध्ये शिवसेनेची शक्ती विरोधकांना दाखवून देऊ. शिवसेनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यासाठी मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई व अनिल देसाई यांचे आभार मानतो.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).