Home हिंदी नवरात्र उत्सव : मंदीर व धार्मिक स्थळे सुरू करण्याकरीता आ. गिरीश व्यास...

नवरात्र उत्सव : मंदीर व धार्मिक स्थळे सुरू करण्याकरीता आ. गिरीश व्यास आग्रही

783

नागपूर ब्यूरो : येत्या 17 ऑक्टोबर पासून शुरू होणाऱ्या अश्वीन नवरात्रच्या निमित्याने श्री आग्याराम देवी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष आ. गिरीश व्यास यांनी नवरात्र उत्सवात मंदीर व धार्मिक स्थळे सुरू करण्याकरीता नागपूरचे जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांना लेखी निवेदन दिले.

शहरातील हाॅटेल्स, रेस्टाॅरेंट बार, सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियमावली तयार केलेली आहे. बार मध्ये बसून दारू ढोसणारे खरेच शासनाची नियमावली पाळणार आहे का? असा प्रश्न आमदार गिरीश व्यास यांनी उपस्थित केला आहे. नवरात्र उत्सवातील गरबा-डांडिया व मिरवणुकांना परवानगी नाकारल्यामुळे भाविकां मधुन नाराजगी व्यक्त होत आहे.

दरवर्षी कोराडी येथील अम्बे जगदंबे आईच्या दर्शनासाठी रिघ राहायची तसेच श्री. आग्याराम देवीच्या दर्शनासाठी भाविक आसूसलेले असायचे परंतु ही भाविकांची श्रद्धा स्थाने बंद असल्यामुळे भाविकांच्या हिरमोळ होत आहे. मंदीर हे भक्तांचे आस्था केंद्र असल्यामुळे मंदीरे पूर्ववत् सुरू व्हावी, अशी लाखों भक्तांची मागणी आहे. अनेक मंदीरांवर अनेक घटक अवलंबुन आहेत. हे लक्षात घेता. नियमावली तयार करून मंदीर व धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे. त्याकरीता नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावे, अशी मागणी आ. गिरीश व्यास यांनी केलेली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).