गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीचा गृहमंत्र्यांनी केला उल्लेख
गडचिरोली ब्यूरो : गडचिरोली पोलिस नेहमीच आपल्या सेवाभावी कामांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या चांगल्या कार्याचा उल्लेख खुद्द महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केला आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलग्रस्त भागातील 21 युवकांना खासगी कंपनीत मिळवून दिली आहे. या कामासाठी भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे आणि पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी पुढाकार घेतला.
https://www.instagram.com/p/CGPiq-tlL_U/?utm_source=ig_web_copy_link
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ” गडचिरोली पोलिस दलातील भामरागडचे पो.उपविभागीय अधिकारी डाॅ.कुणाल सोनवणे व पोनि.संदीप भांड यांनी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील 21 युवकांना हैद्राबाद येथे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवून दिली. भामरागड पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).