Home हिंदी आमदार विकास कुंभारे यांनी तिकीट काढून केला मेट्रोने प्रवास

आमदार विकास कुंभारे यांनी तिकीट काढून केला मेट्रोने प्रवास

772

नागपूर ब्यूरो : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली असून हळू -हळु मेट्रो प्रवासी याचा वापर करीत आहे. महा मेट्रोने तिकीट दरात 50% सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. मेट्रोचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करावा याच पार्श्वभूमीवर मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी बुधवार (21 आॅक्टोबर) ला महा मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला.

यावेळी आमदार श्री. विकास कुंभारे म्हणाले कि नागपूर मेट्रो ने जागतिक स्तराचे कार्य केले आहे. त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी सांगितले की, मेट्रो स्टेशन वर आल्यानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याचे अनुभव येतो.

कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो सेवा सेवा पुन्हा सुरु झाली असून मेट्रो सेवा ही सुरक्षित तसेच जलद असून महा मेट्रोच्या वतीने मेट्रो स्थानकांवर सुरक्षा संदर्भात उत्तम दर्जाच्या सोयी -सुविधा करण्यात आल्या असून नागपूरकरांनी याचा वापर करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय मध्य नागपूरात देखील लवकरात – लवकर मेट्रो सेवा सुरु व्हावी अशी ईच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).