Home हिंदी सन्मान स्त्री शक्तीचा : वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मंगला केतकर यांचे योगदान अतुलनीय

सन्मान स्त्री शक्तीचा : वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मंगला केतकर यांचे योगदान अतुलनीय

815

नागपूर ब्यूरो : नागपुरातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगला केतकर यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांचा सत्कार नवरात्रीनिमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या उपक्रमांतर्गत करताना आम्हाला अतीव आनंद होत असल्याची भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

नवरात्रीचे औचित्य साधून महापौर संदीप जोशी यांच्यातर्फे विविध क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या महिलेचा सन्मान करण्यात येत आहे. पाचव्या दिवशी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. मंगला केतकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे होत्या. मनपाचा मानाचा दुपट्टा, साडी-चोळी, तुळशीचे रोपटे आणि मानपत्र देऊन डॉ. मंगला केतकर यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, . डॉ. मंगला केतकर ह्या डॉ. केतकर हॉस्पीटल आणि नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका आहेत. बर्डी येथे मागील 45 वर्षांपासून त्या प्रसूती क्षेत्रात वैद्यकीय सेवा देत आहेत. मध्य भारतासह देशविदेशातील हजारो दाम्पत्यांना त्यांच्या रुग्णालयातील एन्डोस्कोपी, अल्ट्रासोनोग्राफीचा फायदा झाला आहे. आय.व्ही.एफ.साठी महानगरात धाव घ्यावी लागत असल्यामुळे त्यांनी नागपुरात हीसेवा सुरू केली. केतकर रुग्णालयाला एनएबीएचची अधिस्वीकृती मिळाली आहे. त्याचप्रमाणे नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला आय.एस.ए.आर.ची अधिस्वीकृती मिळाली आहे. डॉ. मंगला केतकर अथकपणे रुग्णसेवेसाठी कार्य करीत असतात. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 2019 मध्ये त्यांना खासदारमहोत्सवात सन्मानित करण्यात आले.सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबाबत त्यांना रोटरी सन्मान प्राप्त झाला आहे. आजवर त्यांनीअनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.

सत्कारानंतर डॉ. मंगला केतकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपण केलेला माझ्या कार्याचा गौरव हा माझ्या पुढील आयुष्यासाठी प्रेरणा देणारा आणि आतापर्यंत केलेल्या कामाप्रति समाधान व्यक्त करणारा आहे. या सत्काराबद्दल आपण शतश: ऋणी असल्याचे त्या म्हणाल्या.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).