Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व रुग्णवाहिका प्रदान

नागपूर न्यूज बुलेटिन : मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व रुग्णवाहिका प्रदान

628

नागपूर शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मनपा सदैव तत्पर आहे. मनपाच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शहरातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मनपाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी प्रदान करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप संस्था आणि काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनतर्फे मनपाला व्हेंटिलेटर व रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी (27 ऑक्टोबर) महापौर कक्षामध्ये ज्ञानदीप संस्थेकडून व्हेंटिलेटर व काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएनच्या वतीने दोन रुग्णवाहिका मनपाच्या आरोग्य सेवेसाठी देण्यात आले आहेत. काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी व्हेंटिलेटर तसेच महाजन आणि असोसिएशनचे सचिव बी.केसी.नायर यांनी ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा असलेली रुग्णवाहिकेची किल्ली महापौर संदीप जोशी यांना सुपूर्द केली. याप्रसंगी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, नगरसेवक भगवान मेंढे, असोसिएशनचे डॉ. हितेंद्र चांदेवार, मोरेश्वर ढोबले, नरेश मॉरिस आदी उपस्थित होते.

महापौर संदीप जोशी यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचा गौरव केला आणि मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर तसेच रुग्णवाहिका दिल्याबददल आभार मानले. प्रवीण महाजन यांनी सांगितले की, ज्ञानदीप संस्थाकडून आतापर्यंत रुग्णांसाठी 10 व्हेंटिलेटर, मेळघाट, हेमलकसा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), मातृसेवा संघ, दंदे फाऊंडेशन, विवेकानंद रुग्णालयांना प्रदान करण्यात आले आहे.


मास्क न लावणा-या 242 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (27 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 242 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 21 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 14948 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 58,33,000/- चा दंड वसूल केला आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 47, धरमपेठ झोन अंतर्गत 57, हनुमाननगर झोन अंतर्गत 26, धंतोली झोन अंतर्गत 7, नेहरुनगर झोन अंतर्गत 5, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 15, लकडगंज झोन अंतर्गत 13, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 29 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 9478 बेजबाबदार नागरिकांकडून रु 47 लक्ष 39 हजार वसूल करण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम 15 सप्टेंबर पासून 500 रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).