Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : लिज धारकांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा : महापौर...

नागपूर न्यूज बुलेटिन : लिज धारकांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा : महापौर जोशी

706

शहरातील धंतोली, काँग्रेसनगर येथील मनपाच्या लिज धारकांच्या समस्यांसंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करून तोडगा काढण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. लिज धारकांच्या विषयांच्या संदर्भाने गुरूवारी (ता.29) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती लता काडगाये, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, विजय गुरूबक्षानी आदी उपस्थित होते.

धंतोली, काँग्रेसनगर भागामध्ये मनपाचे प्लाट आहेत. या संदर्भात तेथील लिजधारकांना डिमांड दिले जात आहेत. हे डिमांड भरण्याबाबत लिजधारकांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असून याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. यासंदर्भात प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी सांगितले की, मनपातर्फे 71 प्लाट लिजवर देण्यात आले असून त्याचे विभाजन करून 109 प्लाट तयार झालेले आहेत. हे प्लॉट स्वत: करीता घर बांधून राण्याकरीता मनपाव्दारे देण्यात आले होते. यापैकी 65 लोकांनी अर्ज सादर केले असून त्यातील 37 जणांचे कागदपत्रेही जमा झालेली आहेत. 15 जणांकडून मात्र डिमांड भरण्यात आले नसून 28 जणांकडे अर्ज प्रलंबित आहे. यासंदर्भात लिजधारक आणि मनपा प्रशासनाद्वारे आपसात सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.


मास्क न लावणा-या 283 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (29 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 283 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 41 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 15516 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 61,17,000/- चा दंड वसूल केला आहे.

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 63, धरमपेठ झोन अंतर्गत 75, हनुमाननगर झोन अंतर्गत 35, धंतोली झोन अंतर्गत 10, नेहरुनगर झोन अंतर्गत 12, गांधीबाग झोन अंतर्गत 20, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 17, मंगळवारी झोन अंतर्गत 23 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 10046 बेजबाबदार नागरिकांकडून रु 50 लक्ष 23 हजार वसूल करण्यात आले आहे.


लकडगंज कडबी बाजार लीज निरस्त करण्याचे ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

ॲड.धर्मपाल मेश्राम

लकडगंज कडबी बाजार मैदान आणि भूखंड क्रमांक 112, 115 आणि 116 ची जागा लवकरच मोकळी होणार आहे. यासंदर्भात मनपाद्वारे देण्यात आलेली लीज निरस्त करण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहे. यासंबंधी विधी समिती सभापती कक्षात झालेल्या बैठकीत सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उपअभियंता सिंगनजुडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, लकडगंज झोनचे बिसेन, मोहरीर शिवणकर आदी उपस्थित होते.

लकडगंज येथील कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक 112, 115 आणि 116 ची एकूण 34 हजार वर्ग फूट जागा मनपाच्या मालकीची आहे. 1992 मध्ये त्याची लीज देण्यात आली होती. मात्र लीजचे नूतनीकरण करण्यात आले नाही. अंकेक्षण झाले नाही. त्या जागेवर अतिक्रमणे झाली. या जागेच्या लीजची आकारणी, दंड असे अनेक विषयावर काय कार्यवाही झाली आदी मुद्यांची तपासणी करण्याकरिता समिती नेमण्यात आली. या समितीद्वारे तपासणी सुरू आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).