Home हिंदी राष्ट्रीय व राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडुंना क्रीडा साहित्य वाटप

राष्ट्रीय व राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडुंना क्रीडा साहित्य वाटप

725

नागपूर ब्यूरो : रविवार (1 नोव्हेम्बर) ला अटल आरोग्य शिबिराचे आयोजन श्रीमती बीझांणी हायस्कूल महाल, नागपुर येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडुंना व्हॉलीबॉल व बास्केटबॉल चे साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन आम. प्रविण दटके यांनी केले व प्रमुख पाहुणे सुबोध आचारे महामंत्री मध्य नागपुर, विवेक अवसरे संयोजक विकास आघाडी, सुधिर अभ्यंकर उपाध्यक्ष, विकास आघाडी, उत्तम मिश्रा अध्यक्ष (MCAD), पियुष आंबुलकर छत्रपती अवार्डी, (सह संयोजक बीजेपी क्रीडा विकास आघाडी,नागपुर), भुषण दडवे मुख्य संघटक PCCAN , नामदेव बलगर (समाजसेवक), धनंजय उपासणी क्रीडा प्रभारी, (बीजेपी दिव्यांग क्रीडा विकास आघाडी, महाराष्ट्र राज्य ), संजय भोसकर सचिव (MSCAD) दिनेश बालगोपाल नगरसेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये नुतन उमरेडकर, गुरुदास राऊत, राहुल लेकुरवाळे, अमोल मारोतकर, जनक साहू, हफिज अंसारी, कमलेश लांजेवार, मंगेश उमरेडकर, दामोदर घंगारे, मतिन बेग, पराग वाटकर, जितेश बंसल, मुस्तफ़ा अंसारी आदि उपस्थित होते.