Home हिंदी नियुक्ति | कोराडी मंदिर च्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

नियुक्ति | कोराडी मंदिर च्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

647

नागपूर ब्युरो : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान च्या अध्यक्षपदी माजी ऊजार्मंत्री, नागपूरचे माजी पालकमंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांची अविरोध निवड करण्यात आली.

संस्थानच्या विश्वस्त मंडळाने बोलाविलेल्या निवडणूक संदर्भातील विशेष बैठकीत मंगळवार (10 नोव्हेंबर) अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे तर सचिव म्हणून दत्तू समरीतकर यांची निवड करण्यात आली. आजच्या या निवडणूक सभेत उपाध्यक्ष म्हणून नंदू बजाज, सहसचिव म्हणून प्रभा निमोने तर कोषाध्यक्ष म्हणून सुशीला मंत्री यांची ही अविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीत विश्वस्त मंडळातील मुकेश शर्मा, अजय विजयवर्गी, केशव महाराज फुलझेले, बाबुराव भोयर, जी. डी. चन्ने, प्रेमलाल पटेल, अशोक खानोरकर, स्वामी निर्मलानंद महाराज, डॉ. नंदिनी त्रिपाठी व लक्ष्मीकांत तळसकर आदी उपस्थित होते. तीन वर्षांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे हे या संस्थांच्या अध्यक्षपदी होते. त्यानंतर अध्यक्षपदाची धुरा मुकेश शर्मा यांच्याकडे देण्यात आली.

आजच्या निवडणूक प्रसंगी व्यवस्थापक पंकज चौधरी गणेश राऊत आदींनी निवडणूक यशस्वी होण्यात कार्यालयीन भूमिका सांभाळली. संस्थांच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आलं


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).