लग्न समारंभामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बँड पथकासाठीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे तर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, बँड पथकामध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्तींचा समावेश असावा. लग्न समारंभात 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून यामध्ये बँड पथकातील सदस्यांची संख्या गृहित धरण्यात येईल. सामाजिक अंतर राखून बँड वाजविणे बंधनकारक राहिल.
रात्री 9 वाजतापर्यंतच बँड वाजविण्याची मुभा असेल. बँड पथकाच्या मालकाने पथकातील सर्व सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग करून नोंद घेणे बंधनकारक आहे. बँड संदर्भातील सर्व साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. पथकातील सर्व व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाजरचा वापर करणे बंधनकारक राहिल. पथकातील एखाद्या व्यक्तीस ताप किंवा इतर कोव्हिड सदृष्य लक्षणे आढळल्रास त्याचा पथकात समावेश करू नये. कोव्हिड-19 अंतर्गत शासनाद्वारे तसेच मनपा आयुक्तांद्वारे वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहिल.
मास्क न लावणा-या 236 नागरिकांकडून दंड वसूली
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (10 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 236 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 18 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 18604 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 76,61,000/- चा दंड वसूल केला आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 43, धरमपेठ झोन अंतर्गत 54, हनुमाननगर झोन अंतर्गत 16, धंतोली झोन अंतर्गत 15, नेहरुनगर झोन अंतर्गत 7, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 16, लकडगंज झोन अंतर्गत 9, आशीनगर झोन अंतर्गत 23, मंगळवारी झोन अंतर्गत 36 आणि मनपा मुख्यालयात 1 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 13134 बेजबाबदार नागरिकांकडून रु 65 लक्ष 67 हजार वसूल करण्यात आले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).