Home हिंदी विधान परिषद निवडणुक। अभिजित वंजारी काँग्रेस चे नागपुरातील उमेदवार

विधान परिषद निवडणुक। अभिजित वंजारी काँग्रेस चे नागपुरातील उमेदवार

585

मुंबई ब्युरो : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी ही माहिती दिली आहे.

गुरुवार ला उमेदवारी फॉर्म भरणार

नागपुर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , पिरिपा ( कवाड़े गट) , आरपीआय( गवई गटआणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड.अभिजित गोविंदराव वंजारी दिनांक 12, गुरुवार ला उमेदवारी फॉर्म भरणार आहे. फॉर्म भरते वेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोले, पालकमंत्री ना. डॉ नितिन राऊत, ना. सुनील केदार, ना.अनिल देशमुख, ना. विजय वदेट्टीवार , ना. विश्वजीत कदम , ख़ासदार बाळु धानोरकर, ख़ासदार क्रुपाल तुमाने, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, नागपुर शहर (आमदार) विकास ठाकरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक तसेच काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे मंत्री, आमदार व पदाधिकारी व सर्व शिक्षक, संस्थाचालक व कर्मचारी संघटने चें पदाधिकारी हे फॉर्म भरते वेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).