नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 224 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 12 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 20534 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 86,26,000/- चा दंड वसूल केला आहे.
शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 26, धरमपेठ झोन अंतर्गत 59, हनुमाननगर झोन अंतर्गत 41, धंतोली झोन अंतर्गत 8, नेहरुनगर झोन अंतर्गत 17, गांधीबाग झोन अंतर्गत 9, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 9, लकडगंज झोन अंतर्गत 7, आशीनगर झोन अंतर्गत 22, मंगळवारी झोन अंतर्गत 20 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 15064 बेजबाबदार नागरिकांकडून रु 75 लक्ष 32 हजार वसूल करण्यात आले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).