Home हिंदी धनगर समाज महासंघाची राज्यव्यापी बैठक 2 डिसेंबर ला धुळे येथे

धनगर समाज महासंघाची राज्यव्यापी बैठक 2 डिसेंबर ला धुळे येथे

1131

नागपूर ब्यूरो : महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक व मार्गदर्शक अण्णासाहेब डांगे यांचे नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची राज्यव्यापी बैठक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांचे अध्यक्षतेखाली  बुधवार दिनांक 2 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता  संतोषी माता चौक शिवतीर्थ जवळ सैनिक लॉंच  धुळे येथे आयोजित केली आहे.

या बैठकीला महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे हे मार्गदर्शन करणार असुन बैठकीला मल्हार सेना सरसेनापती बबनरावजी रानगे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष सौ. पुष्पाताई गुलवाडे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव बैकरे, महासंघाचे जेष्ठ नेते श्रीरामभाऊ पुंडे, अ‍ॅड. निवृत्तीराव करडे , माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार नारायणराव पाटील, माजी आमदार रामरावजी वडकुते, युवा नेते अ‍ॅड. चिमनभाऊ डांगे तसेच प्रदेश सरचिटणीस सुनिल भाऊ वाघ  व  सुभाष भाऊ सोनवणे, सौ. अल्काताई गोडे , युवराज घोडे  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी चे पदाधिकारी व सदस्य, राज्य स्तरिय उच्च समन्वय समिती, राज्यातील  सर्व विभागीय पदाधिकारी मल्हार सेना – अहिल्या महिला संघ – कर्मचारी संघटना या आघाडीचे सर्व  प्रदेश पदाधिकारी तसेच प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस व चिटणीस, कोषाध्यक्ष तसेच निमंत्रित  कार्यकर्ता  यांची संयुक्त महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहीती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे सरचिटणीस युवराज घोडे यांनी दिली आहे.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).