Home मराठी कोरोना संपला नाही, काळजी घ्या!, महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

कोरोना संपला नाही, काळजी घ्या!, महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

804

नागपूर ब्यूरो : नागपूर शहरावर असलेले कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. काही दिवसांपूर्वी दोन अंकी आकड्यावर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा तीन आकडी झाली आहे. आता जर काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होईल. म्हणून काळजी घ्या. स्वत:ला आणि कुटुंबालाही कोरोनापासून दूर ठेवा, सुरक्षित राहा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर शहरात मागील महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांची दररोजची आकडेवारी एक हजारपर्यंत गेली होती. मात्र, त्या काळात नागरिकांनी पाळलेली बंधने, घेतलेली काळजी आणि यंत्रणेने केलेले कार्य यामुळे बऱ्याच अंशी कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. दिवाळीपूर्वीपर्यंत हा आकडा कमी होऊन दोन अंकी झाला होता. मृत्यूसंख्याही आटोक्यात आली होती. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने लोकांनी बाजारात गर्दी केली. बऱ्याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. उत्सवाचा आनंद, उत्साह असला तरी कोरोनाचे संकट विसरायला नको. दिवाळी संपताच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ सुरू झाली. मृत्यूसंख्याही आता वाढू लागली आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर आपण स्वत:सह आपलं कुटुंब, आपलं शहर धोक्यात टाकू, हे भान सर्वांनी ठेवायला हवे. त्यामुळे काळजी घ्या.

कोरोनाच्या निमित्ताने आपण ज्या चांगल्या सवयी लावल्या, त्यावर अंमल सुरू ठेवा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करा, मास्क हा पुढील काही महिन्यांसाठी तरी दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनवा, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळा. हे केले तर आपण लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू, असा विश्वास असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).