Home हिंदी मेट्रो रेल। खापरी ते बुटीबोरी व लोकमान्य नगर ते हिंगणा पर्यंत फिडर...

मेट्रो रेल। खापरी ते बुटीबोरी व लोकमान्य नगर ते हिंगणा पर्यंत फिडर सर्विस उपलब्ध

711

नागपूर ब्यूरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून आता खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाश्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा व प्रवास करने सोईस्कर होईल.

बुटीबोरी आणि हिंगणा या ठिकाणी शहरातून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात आता ही सुविधा सुरु झाल्याने नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन महा मेट्रो द्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.

अश्या प्रकारे करावा प्रवास

खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एम.आय.डी.सी.गेट : खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) व बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत नागपूर महानगरपालिका द्वारा आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. बुटीबोरी एम.आय.डी.सी गेट येथून सकाळी 7.5 वाजता पासून तसेच खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) जाण्याकरिता सकाळी 7.50 वाजता पासून दररोज फिडर बस सेवा उपलब्ध असेल तसेच सायंकाळी अंतिम फेरी बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) येथून खापरी जाण्याकरिता 7.10 मिनिटांनी तसेच खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी (एम.आय.डी.सी गेट) जाण्याकरिता 7.55 मिनिटांनी प्रवाश्यान करिता उपलब्ध असेल.

लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल

लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल व हिंगणा शासकीय हॉस्पिटल ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान देखील आपली बसची सेवा फिडर सर्विस म्हणून प्रवाश्यान करीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवा दररोज हिंगणा येथून सकाळी 7.25 मिनीटांनी व लोकमान्य नगर स्टेशन येथून 8.10 मिनिटांनी उपलब्ध असेल तसेच सायंकाळी अंतिम फेरी 7.00 व 7.30 वाजताची असेल. या व्यतिरिक्त लता मंगेशकर हॉस्पिटल,इसासणी पर्यंत फिडर सेवा लवकरच उपलब्ध करण्याचा मेट्रोचा मानस आहे.

नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी

महा मेट्रोने नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने पाऊले उचलली असून जास्तीत जास्त प्रवाश्याना मेट्रोने जोडण्याचा मुख्य मानस आहे. ज्यामध्ये शहरातील इतर भागांना मेट्रो स्टेशनशी फिडर सर्विसच्या माध्यमाने जोडण्यात आले आहे. आता रूट क्र 4 व 7 सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथून पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर,राजापेठ, म्हाळगी नगर,न्यू सुभेदार नगर,अयोध्या नगर,रघुजी नगर,हनुमान नगर,मेडिकल चौक,बस स्टेशन, कॉटन मार्केट,धरमपेठ, शंकर नगर,रामनगर,रविनगर,डब्ल्यूसीएल कॉलोनी, सेमिनरी हिल, हजारी पहाड या सर्व मार्गावर प्रवाश्यान करिता सुविधा उपलब्ध असेल. तसेच रूट क्र 19 सिताबर्डी मेट्रो स्टेशन ते न्यू नरसाळा पर्यंत देखील या फिडर सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहे. ज्यामध्ये न्यू नरसाळा, भारत माता नगर, महालक्ष्मी नगर, बिडीपेठ, रघुजी नगर बस स्टॉपचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपलब्ध फिडर सेवामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो आणि फिडर सर्विसचा उपयोग करून प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).