Home हिंदी मनोरंजन : संजय दत्त स्टारर ‘सडक 2’ चा ट्रेलर रिलीज, मस्त लुक मध्ये...

मनोरंजन : संजय दत्त स्टारर ‘सडक 2’ चा ट्रेलर रिलीज, मस्त लुक मध्ये दिसतोय संजू

621

मुंबई : आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त स्टारर सडक 2 सिनेमाचा ट्रेलर 12 ऑगस्ट ला प्रदर्शित झाला.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्ट आर्या नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे तर आदित्य रॉय कपूर विशालच्या भूमिकेत दिसेल. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. पण या लव्ह स्टोरीमध्ये खलनायकही आहेत. संजय दत्त रवी नावाच्या एका ट्रॅव्हल एजन्टची व्यक्तीरेखा साकारत आहे. संजयच आलिया आणि विशालला टूरिस्ट बुकिंगवर घेऊन जात असताना त्यांच्या वाटेत अनेक संकटं येतात. सिनेमात आदित्य आणि आलियाला वेगळं करण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आला आहे. पण असं का हे मात्र ट्रेलरमध्ये सांगितलं नाही.

https://www.instagram.com/p/CDiUjX_shOa/?utm_source=ig_embed

डिझ्नी हॉटस्टारवर 28 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोवर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. महेश भट्ट यांनी स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 1991 मध्ये आलेल्या सडक सिनेमाचा हा सिक्वल आहे. पहिल्या सिनेमात पूजा बेदी आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका होता. आता जवळपास 21 वर्षांनंतर महेश भट्टांनी पुन्हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 1999 मध्ये आलेला काडतूस हा त्यांचा अखेरचा दिग्दर्शित केलेला सिनेमा होता.