Home हिंदी Bhushan Dadve | कलार समाजाची उपेक्षा करणाऱ्या भाजप ला निवडणुकीत धड़ा शिकवा

Bhushan Dadve | कलार समाजाची उपेक्षा करणाऱ्या भाजप ला निवडणुकीत धड़ा शिकवा

710

नागपूर ब्यूरो : अखिल भारतीय सर्व वगीॅय कलार समाजाचे अध्यक्ष व जागृत सामाजिक कार्यकर्ता व ओबीसी कार्यकर्ता भूषण दडवे यांनी कलार समाजाची भाजप कडून होणारी उपेक्षा बघता येत्या निवडणुकीत भाजप च्या विरोधात मतदान करण्याचे आव्हान समाज बांधवांना केले आहे.

दडवे म्हणतात कलार समाजातील बांधवांचा भाजप पक्षाने फक्त मतदान घेण्यासाठी 10 वर्षांपासून सातत्याने उपयोग केला. जिल्हा परिषद निवडणूकीत एक ही तिकीट दिली नाही तसेच पक्षात राहूनही संकट काळात सत्ता नसतांही सहकार्य केले पंरतु अनेक वर्षांपासून पक्षाचे हितासाठी व जनहितासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ता यांना डावलण्यात येत आहे. पक्षातील नेत्यांना चळवळीत सक्रिय कार्यकर्ता नको आहेत. अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असतांना कार्यकर्ता यांना शासकीय/ निमशासकीय, महत्त्वाचे बोर्डावर घेतले नाही. आमदाराची तिकीट दिली नाही. मनपा मध्ये महापौर किंवा उपमहापौर बनण्याची पक्षाने संधी दिली नाही. “गरज सरो व वैद्य मरो “अशी कलार समाजातील बांधवांची स्थिती झाली आहे.

दडवे म्हणतात, समाज बांधवांनो जागृत व्हा व मतदान करतांना समाज हितार्थी कोण ह्या बाबत विदर्भातील बांधवांनी विचार करावा. संपूर्ण विदर्भात 20 ते 25 लाख मतदार आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).