जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र ठाकरे यांची माहिती
नागपूर ब्यूरो : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदारांना मतदार यादीतील नाव तसेच मतदान केंद्राची माहिती गुगल सर्च या लिंकवर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारांनी http://103.23.150.139/GTSearch2020 ही लिंक गुगल सर्चवर टाकल्यास मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदाराचे नाव व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
पदवीधर मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी मतदार संघाची मतदार यादी निवडणूक आयोगाच्या http://ceo.maharashtra.gov.in/gtserch1/ या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. मतदारांना सहज आणि सुलभपणे याद्वारे आपले नाव शोधता येईल. नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणूक येत्या मंगळवार, दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. पदवीधर मतदारांना मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. मतदारांनी सोशल डिस्टसिंग तसेच मास्क घालूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).