Home हिंदी गडकरी यांच्या हस्ते 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन

गडकरी यांच्या हस्ते 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन

961

उत्तर प्रदेशमधील 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ

नवी दिल्ली ब्यूरो : देशामध्ये जागतिक दर्जाची राष्ट्रीय टोलनाका करारांना मुद्रांक शुल्कातून वगळण्यात यावे अशी मागणी केंद्रिय रस्ते परिवहन, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेश सरकारकडे केली आहे. काही राज्यात केले जात आहे, त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विकासात भू संपादनाचा वेग वाढवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

इतर राज्यांनी जसे केले आहे, त्याप्रमाणे साधनसामग्री स्थलांतरण शुल्क निम्मे करून ते पाच टक्क्यांवरून 2.5 टक्के करावे, अशी विनंती देखील मंत्र्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी करण्यात आलेल्या भू संपादनाचा मोबदला देखील तातडीने वितरित केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश येथील एकूण 500 किलोमीटर लांबीच्या आणि 7477 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे (व्हर्च्युअल) आभासी पद्धतीने उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभात केंद्रीय मंत्री आज बोलत होते.

गडकरी म्हणाले, गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेश येथे जवळपास 3700 किलोमीटर लांबीचे 42,000 कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात आले आहेत. आज उत्तरप्रदेशात 11,389 किलोमीटर पेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि 1.3 लाख कोटी रुपयांची रस्ते बांधणी झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भू संपादनासाठी राज्यामध्ये 26,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा आणि विकास यामुळे सर्व जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये दळवळण यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

गडकरी म्हणाले, राज्यात सीआरएफच्या कामासाठी 2014 पासून 15,439 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते म्हणाले, मागील वर्षी योजनेअंतर्गत 4628 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर आणखी 287 कोटी रुपये चालू वर्षासाठी मंजूर झाले आहेत. आणि आज आणखी 280 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. राज्याकडून प्रस्ताव मिळाल्यानंतर लगेचच रक्कम वितरित केली जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.

मंत्री म्हणाले, चालू वर्षात उत्तर प्रदेशमध्ये 2,900 किलोमीटर लांबी असलेले साधारण 65,000 कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार आहेत. अन्य 1100 किलोमीटर लांबीचे आणि 14,000 कोटी रुपयांचे मार्ग या वर्षी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 3500 किलोमीटर लांबीचे आणि 50,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे अहवाल तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, असे ते पुढे म्हणाले. मंत्री म्हणाले, दोन लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचे काम उत्तर प्रदेशमध्ये हाती घेण्यात आले आहे.

केंद्रिय रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही. के. सिंह (निवृत्त) म्हणाले, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा यामधील दळणवळण अधिक जलद, विनात्रासाचे होऊ शकेल आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही एक मोठी प्रगती असेल.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).